सहाय्यक संचालक डॉ. संजय रणवीर यांची माकड बाधित क्षेत्रात पाहणी

Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: February 05, 2025 18:17 PM
views 22  views

सिंधुदुर्गनगरी :  माकड तापाच्या (केएफडी) पार्श्वभूमीवर आरोग्य सेवा (हिवताप) चे सहाय्यक संचालक डॉ . संजय रणवीर यांनी माकड ताप दूषित भागाची पाहणी केली. तसेच यावेळी त्यांनी माकड तापाच्या रुग्णांनाही भेट देऊन चर्चा केली.

जंगलातील वन्य प्राण्यांमध्ये वेगवेगळे आजार असतात. त्यापैकी "कॅसनूर फॉरेस्ट डिसिज" (माकड ताप) हा आजार एक जीवघेणा विषाणूजन्य आजार. मोठ्या प्रमाणात झालेली जंगलतोड, माणसाचे झालेले जंगलाकडे स्थलांतर इ. कारणांमुळे अपघाताने का असेना, जंगलतोड करणाऱ्या आणि जंगलात जाणाऱ्या माणसांना हा आजार होताना दिसतो. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग आणि सावंतवाडी तालुक्यात माकड तापाच्या साथीचा प्रादुर्भाव दिसून येतो. या पार्श्वभूमीवर २८ व २९ जानेवारी २०२५ रोजी कोल्हापूर आरोग्य सेवा (हिवताप) चे सहाय्यक संचालक डॉ. संजय रणवीर यांनी जिल्ह्यातील माकड ताप बाधित क्षेत्रात जाऊन पाहणी केली. तसेच यावेळी त्यांनी माकड ताप लागण झालेल्या तसेच माकड ताप बाधित क्षेत्रातील रुग्णांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. 


आजाराची लक्षणे 

दूषित गोचिड चावल्यापासून ३ ते ८ दिवसांत लक्षणे दिसतात.

अचानक थंडी वाजून ताप येणे, डोकेदुखी त्याचप्रमाणे स्नायू दुखी, उलटी, जुलाब तसेच क्वचित प्रसंगी रक्तस्त्राव दिसतो.

बीपी कमी होणे तसेच प्लेटलेट, तांबडया व पांढ-या पेशी कमी होतात.

१ ते २ आठवडयात रुग्ण बरा होतो. १० ते २० टक्के लोकांना ताप बरा होऊन पुन्हा येऊ शकतो.

तिस-या आठवडयानंतर तीव्र डोकेदुखी, मानसिक असमतोलपणा तसेच दृष्टीदोष होऊ शकतो.

अशक्तपणा पुढे १ ते २ महिने राहतो.


जोखीमग्रस्त व्यक्ती

जंगलात काम करणारे वन कर्मचारी, शेतकरी व शिकारी यांना या जंतुसंसर्गाचा धोका आहे.