प्रत्येक मतदारसंघात असेल सखी -युवा - दिव्यांग केंद्र

Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: November 12, 2024 20:36 PM
views 29  views

सिंधुदुर्गनगरी : महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत्या २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. या निवडणूकीसाठी जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदार संघात प्रत्येकी एक महिला, एक युवा व  एक दिव्यांग मतदान केंद्र राहणार आहेत.

विधानसभा निवडणूकीच्या मतदानासाठी जिल्हा निवडणूक अधिकारी अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासनाने चांगली तयारी केली आहे. मतदारांना मतदानासाठी कोणत्याही अडचणी येवू नये, याकरीता भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशप्रमाणे जिल्हा प्रशासन सर्व तयारी करीत आहे. आयोगाच्या सुचनांप्रमाणे प्रत्येक विधानसभा क्षेत्रात एक महिला, एक युवा व  एक दिव्यांग मतदान केंद्र राहणार आहे. याप्रमाणे जिल्ह्यातील तीन विधानसभा क्षेत्रात एकूण ३ महिला, ३ युवा आणि ३ दिव्यांग असे एकूण ०९ विशेष मतदान केंद्र राहणार आहेत. महिला मतदान केंद्रावर मतदान अधिकारी पासून सर्व कर्मचारी हे महिला, युवा मतदान केंद्रावर सर्व कर्मचारी हे युवा राहणार असून दिव्यांग मतदान केंद्रावर दिव्यांग कर्मचारी राहणार आहेत. हे या मतदान केंद्रांचे वैशिष्ट्य असणार आहे. 

महिला (सखी) मतदान केंद्र 

२६८ कणकवली- केंद्र क्र. ३०२, जि.प. प्रा. शाळा नं. १, पश्चिम भाग, कलमठ बाजार

२६९- कुडाळ - केंद्र क्र. २६० बिबवणे, जि.प. पु.प्रा.शाळा बिबवणे क्र. १

२७०- सावंतवाडी-  केंद्र क्र. २६, आडेली, वेंगुर्ला,

दिव्यांग मतदान केंद्र 

२६८ कणकवली- केंद्र क्र. ३३२, जि.प. पूर्ण प्राथ. शाळा नं १,ओसरगाव

२६९- कुडाळ - केंद्र क्र. १२२- बागवाडी, जि.प. प्राथमिक शाळा काळसे, बागवाडी

२७०- सावंतवाडी- केंद्र क्र. ४९- वेंगुर्ला

युवा मतदान केंद्र 

२६८ कणकवली- केंद्र क्र. ६८, जामसंडे, देवगड

२६९- कुडाळ - केंद्र क्र. १०३, मालवण, न.प. रघुनाथ देसाई महविद्यालय मालवण सभागृह

२७०- सावंतवाडी- केंद्र क्र. २८३- दोडामार्ग