सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी इच्छुकांनी नोंदणी करावी !

अॅड. नकुल पार्सेकर यांचे समितीच्या वतीने आवाहन
Edited by: प्रा. रुपेश पाटील
Published on: March 24, 2023 19:13 PM
views 286  views

सावंतवाडी : महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, १९५०चे कलम ४१ (क) अन्वये सिंधुदुर्ग जिल्हा सर्वधर्मीय विवाह सोहळा समिती सहाय्यक धर्मादाय आयुक्त एम. एस. निकम यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन झालेली असून धर्मादाय आयुक्त महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या संकल्पनेतून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन रविवार दिनांक ७ मे २०२३ रोजी शरद कृषी भवन, सिंधुदुर्गनगरी, ओरोस येथे करण्यात  आले आहे. विशेषतः विवाह सोहळ्यासाठी जोडपी निवडताना आदिवासी, आत्महत्याग्रस्त शेतकरी, शहिद जवान, कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची मुले, बेघर, पारधी समाज, अपंग, गरीब व गरजू तसेच मागासवर्गीय मुले, मुली या घटकांचा विचार केला जाणार आहे.

 इच्छुक जोडप्यांचे आधारकार्ड, जन्मदाखला वा शाळा सोडल्याचा दाखला व ज्यांचे पालक हयात आहेत त्यांचे संमतीपत्र आवश्यक आहे. या सामाजिक उपक्रमासाठी समाजातील सर्व घटकांनी सहकार्य करावे. तसेच मदत करु इच्छिणाऱ्यानी व इच्छुक जोडप्यांनी अधिक माहितीसाठी वा आगावू नोंदणीसाठी  दिनांक २० एप्रिल २०२३ पर्यंत समितीचे कार्यवाह अशोक पाडावे, मोबाईल क्रमांक ९८६९२८०५२९, आचरा, अॅड. पुरावा ठाकूर, सहसचिव, मोबाईल क्रमांक ९५४५४१५२२९, मालवण, खजिनदार एल. एम्. सावंत, मोबाईल क्रमांक ९४०५१५३२५५ राजवाडा, सावंतवाडी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन समितीच्या वतीने समितीचे अध्यक्ष अॅड. नकुल पार्सेकर यांनी केले आहे.