
सावंतवाडी : सावंतवाडी शहरातील भटवाडी बाहेरचावाडा झिरंगवाडा माठेवाडा या भागातील रस्ते डांबरीकरण तसेच गटार बांधकाम याची वर्क ऑर्डर होऊन देखील अद्याप कामे चालू झालेली नाहीत. त्यामुळे या भागातील नागरिक त्रस्त झाले असून ही कामे आठ दिवसात सुरू न झाल्यास नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने उपोषण करण्यात येईल, असा इशारा माजी उपनगराध्यक्ष राजू बेग व भाजप शहर उपाध्यक्ष दिलीप भालेकर यांनी सावंतवाडी मुख्याधिकारी यांना निवेदनाद्वारे दिला आहे.