राज्यस्तरीय बालवैज्ञानिक विज्ञान प्रदर्शनात अस्मी मांजरेकरचा गौरव..!

Edited by: भगवान शेलटे
Published on: February 14, 2024 06:14 AM
views 149  views

सावंतवाडी : ५१ व्या राज्यस्तरीय बालवैज्ञानिक विज्ञान प्रदर्शन मध्ये आरपीडी हायस्कूल सावंतवाडीची विध्यार्थिनी अस्मी प्रवीण मांजरेकर हिचा खास गौरव शास्त्रज्ञांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी तिने सदर केलेल्या वकृत्वाला राज्यभरातील शिक्षक, अधिकारी व बालवैज्ञानिकांनी उत्स्फूर्त दाद दिली. जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनातील वकृत्व स्पर्धेत अस्मी मांजरेकर हिचा प्रथम क्रमांक प्राप्त झाला होता. पर्यावरणातील बदलाचा हवामानावर परिणाम.... या विषयावर सात मिनिटे तिने वकृत्व कथन केले होते.राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन मध्ये तेच वकृत्व ठेवण्यात आले होते.

उपस्थित सर्वांनीच अस्मीच्या वकृत्वचे कौतुक केले. यावेळी तिचा खास सन्मानही कऱण्यात आला. राज्य विज्ञान संस्था नागपूरच्या संचालक राधा अतकरी, ज्येष्ठ शास्त्रज्ञ व्यंकटेश गंभीर, अधिव्याख्याते प्रवीण राठोड,शिक्षणाधिकारी प्रदीपकुमार कुडाळकर, डायट च्या अधिव्याख्याता पेडणेकर, सिंधुदुर्ग जिल्हा विज्ञान मंडल अध्यक्ष पांडुरंग काकतकर, गटशिक्षणाधिकारी कल्पना बोडके उपस्थित होत्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सुमेधा धुरी यांनी केले. अस्मी मांजरेकर हिने तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन मध्ये व जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन मध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे. तसेच बांदा नट वाचनालय, श्रीराम वाचन मंदिर, मळगाव खानोलकर ग्रंथालय व अन्य विविध स्पर्धेत अलीकडेच प्रथम क्रमांक पटकावला आहे. आतापर्यंत तिने १०० हून अधिक पारितोषिकं पटकावली आहेत.