LIVE UPDATES

गुरुपौर्णिमेनिमित्त अशोक सावंत यांनी घेतले खा. नारायण राणेंचे आशीर्वाद

Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: July 31, 2026 18:33 PM
views 84  views
#kokansadlive#news update#konkan update#

मुंबई : गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने  माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अशोक सावंत यांनी मुंबई येथील 'आधिश' निवासस्थानी जाऊन माजी केंद्रीय मंत्री व खासदार नारायण राणे यांची भेट घेत त्यांचे आशीर्वाद घेतले.यावेळी अशोक सावंत यांनी खासदार नारायण राणे यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करत त्यांचे आशिर्वाद घेतले. अशोक सावंत हे १९९० पासून आजपर्यंत राणे कुटुंबाशी एकनिष्ठ राहिले असून, प्रत्येक राजकीय टप्प्यावर त्यांनी निष्ठेने साथ दिली आहे. त्यांच्या या दीर्घकालीन निष्ठेचे पुन्हा एकदा यानिमित्ताने दर्शन झाले. यावेळी विविध सामाजिक, राजकीय आणि विकासात्मक विषयांवरही दोघांमध्ये मनमोकळी चर्चा झाली.