राणेंच्या प्रचारार्थ अशोक पवार सक्रीय...!

Edited by:
Published on: May 02, 2024 10:00 AM
views 308  views

सावंतवाडी : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे व्हीजेएनटी सेलचे जिल्हाध्यक्ष अशोक पवार यांचा महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारार्थ जिल्ह्यातील अनेक तालुक्यात बैठका घेतल्या.  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे व्ही जे एन टी सेलचे जिल्हाध्यक्ष अशोक पवार यांनी महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचाराचा झंजावात चालू केला असून, जिल्ह्यातील अनेक तालुक्यात प्रचाराच्या माध्यमातून बैठका घेतल्या त्यामध्ये दोडामार्ग, मालवण, सावंतवाडी, इत्यादी तालुक्यात गावागावांमध्ये जाऊन प्रचार करण्यात आला.

त्यावेळी विमुक्त जाती तसेच भटक्या जमातीतील लोकांना नारायण राणे यांना मतदान करण्याचे आवाहन केले. यावेळी आशिष कदम, मालवण तालुकाध्यक्ष नाथा मालवणकर, दीपक मोहिते, अक्षय जाधव, व्हीजेएनटी सेल तालुकाध्यक्ष सुरेश पवार आदि पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.