
मंडणगड : संधी अभावी अद्यापही मुळ प्रवाहात न आलेल्या कोकणातील बुध्दी संपदेला पुढे नेण्यासाठी छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मनुष्यबळ विकास संस्था (सारथी) कटीबध्द असल्याचे प्रतिपादन संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे यांनी केले.
कोकण दौऱ्यावर असलेल्या काकडे यांनी २४ जानेवारी २०२५ रोजी शेनाळे येथील दळवी एज्युकेशनल अँण्ड चँरीटी ट्रस्टचे महाराष्ट्र पॉलीटेक्नीक महाविद्यालयास शेनाळे येथे भेट दिली. यावेळी त्यांनी राज्यशासनाच्या या स्वायक्त संस्थेची विस्ताराने माहीती दिली राज्यातील मराठा, कुणबी मराठा, मराठा कुणबी या समाज घटकांच्या शिक्षण, रोजगार व स्वंयरोजगार यांचे प्रगतीकरिता संस्थेच्या माध्यमातून सुरु असलेले विविध उपक्रम व कार्याची यावेळी विस्ताराने माहीती दिली व विशिष्ठ्य गतीने सुरु असलेल्या संस्थेच्या कार्यात कोकणवासीयांनीही मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले. संस्थेचे माध्यमातून कोकण कृषी विद्यापिठात ड्रोन फवारणी प्रशिक्षण अभ्यासक्रमांचा एम.यु.व्ही झालेल्या असल्याचे जाहीर करताना नमुद समाज घटकांतील पात्र लाभार्थीसाठी शेतीत मोठी क्रांती आणणारे हे तंत्रज्ञान संस्थेच्या माध्यमातून मोफत उपलब्ध दिले जाणार असल्याचे स्पष्ट केले.
संस्थेच्या माध्यमातून २६ जानेवारी २०२५ रोजी चावडी वाचन अभियान हा विशेष उपक्रम राबविला जाणार आहे. या उपक्रमातंर्गत सारथी सी.एस.एम.एस व डी.इ.इ.पी या उपक्रमातंर्गत विविध लाभ झालेले पाच हजार विद्यार्थी ग्रामसभेत चावडी वाचन या उपक्रमास हजर राहून सारथी या संस्थेच्या विविध योजनांची माहीती देवून मागदर्शन करणार आहेत. १९ फेब्रुवारी २०२५ रोजी ९ कृषी विज्ञान केंद्रांत शेतकरी प्रशिक्षणास सुरुवात करण्यात येणार आहे. संस्थेच्या शिकता शिकता कमवा योजनेतील विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना कपडे घेण्याचा उपक्रम राबविण्यात येणार आहे. राज्यातील १०० गड किल्यावर स्वच्छता अभियान राबवण्यात येणार आहे. याचबरोबर या दिवशी दापोली येथील कोकण कृषी विद्यापिठात ड्रोन प्रशिक्षण कार्यक्रमास सुरुवात होणार आहे. या कार्यक्रमास दळवी एज्युकेशनल ट्रस्टचे अध्यक्ष अजय दऴवी. अँड. सुशील दळवी, प्राचार्य अरुण ढंग, पोलीस निरिक्षक नितीन गवारे, पत्रकार महेश महाजन महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी सारथीचे अधिकारी व महाविद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते.