
कणकवली : पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा( स्कॉलरशिप परीक्षा) कळसुली इंग्लिश स्कूल कळसुली व ज्युनिअर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड आर्ट्स प्रशालेत शिकणारा आठवीतील विद्यार्थी अश्मित शैलेश मुळीक याने राष्ट्रीय ग्रामीण शिष्यवृत्ती जिल्हा गुणवत्ता यादीत दहावा क्रमांक तर कणकवली तालुक्यात द्वितीय क्रमांक प्राप्त केला.
यशस्वी विद्यार्थ्याला मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षक पालक यांचे अभिनंदन मुख्याध्यापक व्ही. व्ही. वगरे आणि संस्था पदाधिकारी ग्रामस्थ हितचिंतक यांच्याकडून करण्यात आले.