'आशा' अर्थात गुलाबी साडीतील देवदूत : गटविकास अधिकारी वृक्षाली यादव

Edited by: नागेश दुखंडे
Published on: March 28, 2024 10:49 AM
views 456  views

देवगड : माता मृत्यू आणि बाल मृत्यूना आळा घालणाऱ्या, उन्ह - वारा अन्‌ पावसाची तमा न बाळगता डोंगरदऱ्यांसह सर्वत्र घरोघरी पायी फिरून गरोदर मातांची काळजी घेणाऱ्या आशा स्वयंसेविका म्हणजे गुलाबी साडीतील देवदूतच. अशा या आशांचे कौतुक करण्यासाठी "आशा दिन' म्हणून साजरा केला जात आहे. शासनाने त्यांच्यावर महत्त्वाची कामे सोपविली आहेत. प्रसूती, आरोग्याबाबतची अनास्था, समाजात होणारे माता आणि बालमृत्यूचे प्रमाण तसे मोठे होते. ते रोखणे आदी महत्त्वाची कामे आशा सेविका यांच्यावर शासनाने सोपविले आहेत. ती कामे अचुक व तत्परतेने आशा करत असल्याने त्यांचा गौरव व्हावा या दृष्टीने हा आशा दिन महत्त्वाचा दिवस असल्याचे प्रतिपादन गटविकास अधिकारी वृक्षाली यादव यांनी व्यक्त केला .

           सांस्कृतिक भवन जामसंडे सभागृहात आशा दिवस गटविकास अधिकारी देवगड श्रीम .वृक्षाली यादव , सहाय्यक गटविकास अधिकारी श्री . मुकेश सजगाने व  तालुका आरोग्य अधिकारी डॉ .उमेश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. 

        या कार्यक्रमाचे उद्घाटन गटविकास अधिकारी देवगड वृक्षाली यादव यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करून करण्यात आले.

      यावेळी व्यासपिठावर वैद्यकीय अधिकारी इळये डॉ. मेहूल जाधव , वैदयकीय अधिकारी मोंड डॉ. सोनाली तेली , कक्ष अधिकारी संतोष बिर्जे, आरोग्य विस्तार अधिकारी प्रतिमा वळंजु, आरोग्य विस्तार अधिकारी गंगुताई अडुळकर , पोलीस प्रतिनिधी पी .एस. कविटकर, आरोग्य कर्मचारी मदन मसके, बाबुराव वरक, प्रणिता राऊळ , स्वप्निल झोरे , सागर जाधव , इशान्वी सुर्वे , आदी मान्यवर उपस्थित होते .

           यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ .उमेश पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना म्हणाले की आशा स्वयंसेविका शासनाच्या सर्व योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोचविण्याचे काम करत असतात. नागरिक आणि शासनामधील त्या महत्त्वाचा दुवा ठरल्या आहेत. अशा या आशा स्वयंसेविकांचा गौरव करण्यासाठी हा आशा दिन महत्वाचा दिवस असल्याचे मत व्यक्त केले .

        आशा दिनानिमित्त  उत्कृष्ट कार्य करणाऱ्या आशांचा सन्मान करण्यात आला त्यामध्ये तालुक्यात प्रथम क्रमांक रेश्मा जयराम कदम ( इळये ) द्वितीय क्रमांक निलीमा नागेश सारंग (इळये ) व  तृतीय क्रमांक आचंल आनंद लाड यांनी पटकावला तर उत्कृष्ट गटप्रवर्तक म्हणून अर्पिता शरदचंद्र फाटक हिने पटकावला . तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रस्तर प्रथम क्रमांक पडेल बीट मॅगी फर्नांडिस ( विजयदुर्ग ), मोंड बीट संजना पुजारे ( बापर्डे ) , फणसगांव  बीट सुष्मा घाडी ,मिठबांव बीट श्रृतिका कदम ( कुणकेश्वर )इळये बीट कविता घाडी ( दाभोळे ) शिरगांव बीट विषया दळवी ( तळवडे ) आदींना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आले तसेच   पाककला स्पधेत  प्रथम क्रमांक साक्षी घाडी ( पडेल ) , द्वितीय क्रमांक स्वाती गांवकर ( मिंठबांव ) , तृतीय क्रमांक समिता नारींग्रेकर ( शिरगांव ) या विजेत्या  आशांचा मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तु व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला . 

          तसेच आशाच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . तसेच पाककला स्पधेचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये प्रथम क्रमांक साक्षी घाडी ( पडेल ) द्वितीय क्रमांक स्वाती गांवकर ( मिठबांव ) तर तृतीय क्रमांक समिता नारींग्रेकर ( शिरगांव ) यांनी पटकावला या विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तु व सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले . तसेच फनी गेम्स स्पधेत धनश्री मांडवकर ( इळये ) हिने प्रथम क्रमांक पटकावला.

        या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन  स्वप्निल झोरे, तर आभार बाबुराव वरक यांनी मानले .