
वैभववाडी : महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद पुणे यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या नॅशनल मीन्स कम-मेरिट स्कॉलरशिप, एनएमएमएस परीक्षेत माधवराव पवार विद्यालयाची विद्यार्थिनी आसावरी केशव सरवळकर हिला राष्ट्रीय शिष्यवृत्ती प्राप्त झाली. तसेच आर्थिक दुर्बल प्रवर्गात सिंधुदुर्ग जिल्ह्यात ५ वा क्रमांक प्राप्त केला.
महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद पुणे यांच्यावतीने डिसेंबर २०२४ मध्ये एनएमएमएस ही परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. यामध्ये आसावरी हिने ८८ गुण मिळविले.ती शिष्यवृत्तीस पात्र ठरली आहे. पुढील चार वर्षांत तिला ४८ हजार रुपये एवढी शिष्यवृत्ती प्राप्त होणार आहे. तिने मिळविलेल्या यशाबद्दल सर्व स्तरातून तिचे कौतुक होत आहे.