
कणकवली : कणकवली तालुक्यातील नांदगाव असलदे मुस्लिम वाडी कुटुंबातील वसिम साठविलकर यांची आमदार नितेश राणेंच्या माध्यमातून यशस्वी शस्त्रक्रिया झाल्यानंतर आज आमदार नितेश राणेंचे त्यांच्या कुटुंबियांनी आभार मानले असून शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला आहे.वसीम साठविलकर यांची बहीण यास्मीना हुसेन मिया बटवाले तसेच अहमद बटवाले, रज्जाक बटवाले यांनी शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन आभार मानले आहे.यावेळी पंढरी वायंगणकर,भाई मोरजकर, हर्षदा वाळके, सरपंच आफ्रोजा नावलेकर, प्रकाश परब, मुस्ताक बटवाले ,यासीन पाटणकर, जाफर कुणकेरकर, दादा साठविलकर, शाहिद बटवाले, अल्लाउद्दीन बोबडे, शकील बटवाले, इरफान साठविलकर, आदी अनेक मुस्लिम बांधव उपस्थित होते.