BIG BREAKING ; पावसाळा संपताच निवडणूकांचं वाजणार बिगुल

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: July 07, 2023 11:49 AM
views 395  views

मुंबई : आताच्या घडीची मोठी माहिती. गेले वर्षभर रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता पावसाळा संपल्यानंतर होणार आहेत.

सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यात या निवडणुका होणार आहेत. यामध्ये महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद, ग्रामपंचायत आदींचा समावेश आहे.राज्य निवडणूक आयोगाकडून तशी तयारी सुरू झाली आहे. या निवडणूकांसाठी मतदार याद्या तयार करण्याचे काम सुरू केले आहे.