
दोडामार्ग : दोडामार्ग शहर बाजारपेठमध्ये डांबरी राज्यमार्ग खोदला जात असताना त्याविरोधात जोरदार आवाज उठविणारे शिवसेनेचे आक्रमक शहरप्रमुख ओंकार कुलकर्णी यांनी दिलेल्या आंदोलन इशाऱ्यामुळे एम एन जी एल कंपनीनं अखेर दोडामार्ग बाजारपेठ मध्ये खोदलेल्या रस्त्यावरील चरात खडी टाकून त्यावर रोडरोलर फिरविला. आता जांभा दगड टाकून खोदलेल्या चरावर दुरुस्ती केली जात असल्याने आपल्या पाठपुराव्याला यश आल आहे, अशी माहिती ओंकार कुलकर्णी यांनी दिली असून, त्यांचं या कामाबद्दल सामान्य नागरिकांतून कौतुक होत आहे. दरम्यान, मुख्य बाजारपेठ जिल्हा बँक ते परमेकर हॉल आयी रोड या दरम्यान अजूनही खोदलेल्या चराने नागरिकांना त्रासच होत असल्याने रस्ता खोदणाऱ्या कंपनीने त्या चरात डबर टाकुन त्यावर काँक्रीट करण करावे, अशी मागणी केली जात आहे. आपण यासाठी सुद्धा सार्वजनिक बांधकाम खात्याला आचार संहिता संपताच जाब विचारणार असल्याचे ओंकार कुलकर्णी यांनी स्पष्ट केलंय.
काही झालं तरी या 'एमएनजीएल'च्या ठेकेदारांची मस्ती जिरविल्याशिवाय आपण गप्प बसणार नाही. माझ्या शहरातील नागरिकांना हे ठेकेदार आणि रस्ते सुरक्षेची जबाबदारी असलेले बांधकाम खात्याचे अधिकारी यांना आपण मोकळे सोडणार नाहीं असा इशारा दिला आहे. खासदार विनायक राऊत यांचे सुद्धा ओंकार कुलकर्णी यांनी अगदी अग्रेसीवपणे लक्ष वेधले होते. त्याचा त्यांनी सातत्याने बांधकाम खात्याकडे पाठपुरावा केल्याने मुख्य बाजारपेठ चरात एमएनजीएल कंपनीच्या ठेकेदारांनी खडीकरण केलं. त्यामुळे नागरिकांना काही अंशी दिलासा मिळाला. मात्र अजूनही धूळ, चिखल आणि खोदकाम यातून नागरिक सुटलेलं नाहीत, त्यासाठी आपण बांधकाम ला धारेवर धरणारच, ग्रामपंचायत निवडणूक आचारसंहिता संपताच याचा जाब विचारण्यात येईल, असा इशारा कुलकर्णी यांनी दिला आहे.