
बांदा : भाजपा कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख तथा माजी खासदार निलेश राणे यांचे बांद्यात जंगी स्वागत // ढोल ताशांचा गजरात, फटाक्यांच्या आतिषबाजीत निलेश राणे आगे बढो....हम तुम्हारे साथ है च्या दिल्या घोषणा // घोषणांनी परिसर गेला दणाणून // दोन दिवसांपूर्वीच माजी खासदार निलेश राणे यांनी राजकारणातून निवृत्ती घेण्याचे केले होते जाहीर // निलेश राणेंच्या या निर्णयानंतर भाजपामध्ये उडाली होती खळबळ // सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी मुंबईत निलेश राणे यांची घेतली होती भेट // भेटीत निलेश राणे यांची केली होती मनधरणी // त्यांनतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फाटक यांचीही घेतली होती भेट // दोन्ही नेत्यांनी निलेश राणे यांची मनधरणी करत केली होती नाराजी दूर // कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष होत होता त्यामुळे निलेश राणे होते नाराज // अखेर कार्यकर्त्यांच्या अडचणी जाणून सोडवण्याचा रवींद्र चव्हाण यांनी दिला शब्द // कार्यकर्त्यांनीही निलेश राणे यांच्या पाठीशी राहण्याचा घेतला होता निर्णय // त्यानंतर आज निलेश राणे यांचे सिंधुदुर्गात झाले आगमन // जिल्ह्याच्या सीमेवर बांदा येथे निलेश राणे यांचे जंगी स्वागत // मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते होते उपस्थित // स्वागतानंतर शेकडो गाड्यांच्या ताफ्यासह निलेश राणे कुडाळसाठी झाले रवाना //