नितेश राणेंनी शपथ घेताच वेंगुर्ल्यात जल्लोष

Edited by:
Published on: December 15, 2024 19:04 PM
views 345  views

वेंगुर्ला : हिंदू धर्म रक्षक व कणकवली -वैभववाडी देवगडचे आमदार नितेश राणे यांनी आज मंत्री पदाची शपथ घेतली. याचा जल्लोष वेंगुर्ला भाजपाच्या वतीने करण्यात आला.भाजपा कार्यालयासमोर फटाके फोडून व लाडू वाटून आनंद साजरा करण्यात आला.

कणकवली विधानसभा मतदारसंघात सलग तिसऱ्यांदा निवडून आलेल्या आम.राणेंची आज फडणवीसांच्या मंत्रीमंडळात वर्णी लागली.नागपुर येथे आम.राणेंनी मंत्री पदाची शपथ घेतली.यानंतर वेंगुर्ला तालुक्यात भाजपा कार्यकर्त्यांनी फटाके फोडून मोठा जल्लोष केला. तसेच एकमेकांना लाडू भरवून कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केला.