तब्बल २१ कोटींचा दंड वसूल | टिसिंचा खास सन्मान

Edited by:
Published on: June 20, 2024 06:32 AM
views 454  views

रत्नागिरी : कोकण रेल्वेच्या मार्गावर  गेल्या वर्षभरात सर्वोत्तम कामगिरी करत अवैध प्रवास रोखण्यात यश मिळवलेल्या कोकण रेल्वेच्या तिकीट तपासनीसना सन्मानित करण्यात आले आहे. या आर्थिक वर्षात तिकीट तपासनीसानी तब्बल 21 कोटी 17 लाख 80 हजार 741 रुपयांचा दंड वसूल केला आहे.

 गेले काही काळ कोकण रेल्वेच्या मार्गावर अवैध आणि विनातिकीट प्रवास करणाऱ्या मंडळी विरोधात विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत कोकण रेल्वेच्या मार्गावर काम करणाऱ्या तिकीट तपासनिसानी उत्कृष्ट कामगिरी करत 78115 कारवाया केल्या. यातून 21 कोटी 17 लाखाचा दंड वसूल करण्यात आला. गेल्या आर्थिक वर्षात मार्गावर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सर्व तिकीट तपासनिसांना कोकण रेल्वेचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा यांच्या  हस्ते सन्मानित करण्यात आले. संतोष कुमार झा यांनी गेल्या आर्थिक वर्षात तिकीट तपासनिसानी केल्या कामगिरीचे कौतुक केले.