श्री क्षेत्र कुणकेश्वर मंदिर येथे तब्बल ३१ हजार दिव्यांची होणार आरास.!

नामांकित गायक उधळणार स्वरांजली.
Edited by:
Published on: November 13, 2023 13:29 PM
views 117  views

देवगड : श्री क्षेत्र कुणकेश्वर मंदिर येथे श्री देव कुणकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट आणि ग्रामस्थ कुणकेश्वर यांच्या वतीने प्रतिवर्षी दिपावली पाडवा दिवशी दीपोत्सव साजरा करण्यात येतो. या दीपोत्सव कार्यक्रमा दरम्यान असंख्य भाविक सहभागी होत असतात. यावर्षीचा दीपोत्सव दिनांक १४ नोव्हेंबर २०१३ रोजी साजरा होत आहे. त्यानिमित्त मंदिर व मंदिर परिसरामध्ये एकतीस हजार दिव्यांची आरास होणार असून विविध प्रकारच्या रांगोळ्या साकारल्या जाणार आहेत.

यासाठी सर्व रांगोळी कलाकारांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात येत आहे. यादिवशी सायंकाळी  ०६:०० ते ०८:३० या वेळेमध्ये ‘स्वर निषाद मुंबई प्रस्तुत, सुमधुर गाण्यांची मैफिल हा सांजसंगीताचा कार्यक्रम सादर होणार असून व्याचे मुख्य संकलन श्री. हेमंत कुमार लवटे यांचे असून यात गायक हर्ष नकाशे, सागर कुडाळकर, गायिका नयन हार्प, ॲड. सिल्दी परव सहभागी होणार आहेत. या संगीत मैफिलीचे निवेदन अक्षय सावाडेकर हे करणार आहेत.

दरम्यान सायंकाळी ०६:३० वाजता मंदिरामध्ये मान्यवरांच्या हस्ते दिपप्रजोतनाचा कार्यक्रम होताच मंदिर व मंदिर परिसरातील दिप उजळले जाणार आहेत. त्यामध्ये प्रतिवर्षाप्रमाणे सर्व भाविक भक्तांनी सहभागी कावे असे आवाहन ट्रस्ट वतीने करण्यात येत आहे. तसेच रात्री ०८:३० ते ०९:०० वाजता सन्मान सोहळा व त्यानंतर ०९:०० से ०९:३० पालखी प्रदक्षिणा सोहळा होणार आहे. तरी सर्व भाविक भक्तांनी या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन ट्रस्ट वतीने करण्यात येत आहे.