सामाजिक बांधिलकीकडून तब्बल २५ गतिरोधकांना पट्टे

कोणाचे काम आणि कोणावर भार..?
Edited by:
Published on: February 01, 2025 10:53 AM
views 154  views

सावंतवाडी : शहरात वाढते अपघात व गतिरोधकांवर नसलेले पट्टे बघता सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठाननं अभिनव उपक्रम राबविला. शहरातील तब्बल २५ गतिरोधकांना पट्टे मारण्यात आले. तसेच ज्या भागात खडीमुळे अपघात होत होते तिथेही स्वच्छता करण्यात आली.

शुक्रवारी रात्री हा उपक्रम सावंतवाडी शहरात राबविण्यात आला. या उपक्रमासाठी सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव, समीरा खलील, सुजय सावंत, आमीन खलील,युवराज राऊळ, गौरव रजपूत तसेच या उपक्रमासाठी विशेष सहकार्य करणारे पेंटर व सामाजिक बांधिलकीचे कार्यकर्ते लक्ष्मण कदम, पेंटर मंगेश सावंत यांनी विशेष योजदान दिले. या उपक्रमात सामाजिक कार्यकर्ते देव्या सुर्याजी, अजय गोंडावळे, संदीप निवळे, प्रथमेश प्रभू, सुशील चौगुले, संजय वरेरकर, गजानन बांदेकर, नीरज देसाई, निखिल मोरजकर, प्रशांत मोरजकर आदींनी सहभाग घेतला. सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे.