अरविंद करलकर यांनी घेतली संजय मोरे यांची भेट

Edited by: प्रसाद पाताडे
Published on: November 24, 2023 17:55 PM
views 498  views

कुडाळ : कुडाळ शिवसेना उपतालुकाप्रमुख अरविंद करलकर तथा मंत्री सहायता मदतनीस कक्ष तालुकाप्रमुख यांनी शिवसेना शिंदे गटाचे शिवसेना सचिव संजय मोरे यांची मुंबईत येथे भेट घेत कुडाळ तालुक्यातील विविध विकास कामा संदर्भात चर्चा केली. यावेळी अरविंद करलकर यांनी शिवसेनेचे सचिव संजय मोरे यांच्याशी पक्ष प्रमोशन आणि इतर वेगवेगळ्या विषयवार चर्चा करण्यात आली.

सर्व कामे लवकरात लवकर मार्गी लावण्यात येतील असे आश्वासन करलकर यांना देत आवश्यक विकास कामांसाठी निधी देण्याचे मान्य केले. असल्याचे  करलकर यांनी सांगितले. यावेळी अरविंद करलकर यांच्या सोबत  शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी, शिवसेना महिला जिल्हाप्रमुख वर्षा कुडाळकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख नीलम शिंदे, शिवसेना देवगड तालुकाप्रमुख साळसकर उपस्थित  होते.