अरुंधती निवतकर मेहंदळेला इलेक्ट्रॉनिक्स इंजीनियरिंगमध्ये पीएचडी

Edited by:
Published on: July 27, 2025 19:07 PM
views 141  views

मसुरे :  मूळ मसुरे येथील आणि सद्यस्थितीत मुंबई येथे नोकरी निमित्त असणाऱ्या डॉ. अरूंधती योगेश निवतकर मेहंदळे  हिने शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथून इलेक्ट्रॉनिक्स इंजीनियरिंग मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा विषय घेत या मध्ये पीएचडी संपादन करून घवघवीत यश संपादन केले आहे. तिच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. 

अरुंधती निवतकर मेहंदळे हिचे  मूळ घर मसुरे येथे असून तिचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मसुरे गावातच झाले आहे. शालेय जीवनात अरुंधती ही अतिशय हुशार आणि मेहनती विद्यार्थिनी होती. शालेय जीवनात तिने अनेक स्पर्धा परीक्षा मध्ये घवघवीत यश संपादन केले होते. तसेच विविध पुरस्कार मिळविले होते. आताही तिने इंजिनिअरिंग मधील पीएचडी पूर्ण करून घवघवीत यश संपादन केले आहे. मसुरे गावातील शिक्षण प्रेमी लोकप्रतिनिधी यांनी तिचे विशेष अभिनंदन केले आहे. अरुंधती या सध्या मुंबई जुहू येथील प्रतिष्ठित अशा एसएनडीटी इंजीनियरिंग कॉलेजमधील डाटा सायन्स विभागात प्रोफेसर म्हणून कार्यरत आहे. अरुंधती ही मसुरे येथील प्रतीत यश असे डॉक्टर सुधीर मेहंदळे यांची कन्या आणि मालवण शासकीय रुग्णालय येथील डॉक्टर अनिरुद्ध मेहंदळे यांच्या भगिनी आहेत.