
सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कलाकारामध्ये टॅलेंट'मोठ्या प्रमाणात भरलेले आहे. त्यामुळे अशा नवोदित मुलांना नृत्य व क्रीडा शिक्षण क्षेत्रात व्यासपीठ मिळवून देण्यासाठी कायम त्याच्या पाठिशी राहू अस प्रतिपादन भाजपचे माजी तालुकाध्यक्ष संदीप गावडे यांनी केले. ओंकार कलामंचच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या डान्स सावंतवाडी डान्स या राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी या स्पर्धेतील प्रथम पारितोषिक पटकावणाऱ्या चिपळूण येथील संघाला त्यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
ओंकार कला मंचच्या डान्स अकॅडमीच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेला डान्स सावंतवाडी डान्स या राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेसाठी उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यात तब्बल १६ संघ आणि २१ सोलो डान्स स्पर्धक सहभागी झाले होते. या स्पर्धेचे बक्षीस वितरण श्री. गावडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थित कलाकारांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. ते म्हणाले, सावंतवाडी आणि विशेषता सिंधुदुर्ग जिल्हा विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात "टॅलेंट" आहे. मात्र अशा कलाकारांना योग्य ते व्यासपीठ मिळणे गरजेचे आहे. त्यासाठी आपण नेहमी प्रयत्न करणार आहोत. येथील विद्यार्थी मोठ्या पडद्यावर चमकावेत यासाठी नृत्य क्रीडा व शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या विद्यार्थ्यांना आपण सहकार्य करणार आहोत. यावेळी त्यांनी ओंकार कलामंचच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय स्पर्धेचे कौतुक केले. नवोदित कलाकारांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी आयोजित करण्यात आलेले स्पर्धा कौतुकाची बाब आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून उद्याचे कलाकार घडणार आहेत. त्या दृष्टीने सुरू असलेले प्रयत्न कौतुकास्पद आहे. यावेळी त्यांच्या उपस्थितीत नृत्य स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले. यात प्रथम क्रमांक आलेल्या चिपळूण येथील एन.के. कलामंच या संघाला १० हजार रुपयाचे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. तर सोलो डान्स स्पर्धेतील मुंबई येथील कलाकार घनश्याम सोनावणे याला ५ हजार रुपयांचे पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. यावेळी सोलो स्पर्धेत सोहम जांभुरे व समर्थ गवंडी यांनी द्वितीय, श्राव्या पाटणकर तृतीय, नंदिनी बिले उत्तेजनार्थ तर ग्रुप डान्स स्पर्धेत परी डान्स क्रिएशन द्वितीय, आरडीएक्स स्क्रीव तृतीय तर ज्ञानदीप कला मंच उत्तेजनार्थ या यशस्वी स्पर्धकांना गौरविण्यात आले.
यावेळी ओंकार कलामंचाचे अध्यक्ष अमोल टेंबकर, डान्स अकॅडमीचे प्रमुख अनिकेत आसोलकर, सागर ढोकरे, नृत्य दिग्दर्शक मंदार काळे, हेमंत पांगम, सचिन मोरजकर, चैतन्य सावंत, आनंद काष्टे, अभिषेक लाखे, नारायण पेंडुरकर, किसन धोत्रे, साई हनपाडे, स्टेला डॉन्टस, खुशी सावंत, सिद्धेश सावंत, स्वरूप कासार, सोनाली बरागडे, ओम टेंबकर, रसिका धुरी, नागेश पाटील, नितेश देसाई, भुवन नाईक, मृणाल पावसकर, आर्या टेंबकर, ख़ुशी वेंगुर्लेकर, रोहित पाळणी, संहिता गावडे, विशाल तुळसकर, अमित आसोलकर, अमरेश आसोलकर, प्रशांत मोरजकर आदी उपस्थित होते.