
सिंधुदुर्ग : पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत प्रशिक्षण घेतलेल्या 40 लोकांना आर्टिझन कार्ड वाटप करण्यात आले. तसेच संत भोजलिंग काका महाराज सुतार समाज आर्थिक महामंडळ युती सरकारने नव्याने स्थापन केल्याने त्या योजनेअंतर्गत येणाऱ्या सर्व व्यवसाय वैयक्तिक शैक्षणिक लाभ सुतार समाज बांधवांनी घ्यावा असे आवाहन आनंद मेस्त्री यांनी केले. विश्वकर्मीय सुतार समाज राज्य समन्वयक आनंद मेस्त्री, जिल्हा समन्वयक प्रकाश मेस्त्री, मालवण समन्वयक राजू मेस्त्री, संजय मेस्त्री, नारायण सुतार, तालुका अध्यक्ष रामदास मेस्त्री, तालुका समन्व्यक व इतर ज्ञाती बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.