
सावंतवाडी : गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी आज कोकणात हरितालीकेच आगमन झालं आहे. विवाहित महिलांसाठी हरतालिका सणाचं खूप महत्त्व आहे. आज दिवशी विवाहित स्त्रिया नवीन वस्त्रे परिधान करून सोळा शृंगार करत हरितालिकेची पूजा करतात. हरतालिकाचे व्रत हे कठीण व्रत मानले जातात. विवाहित महिला निर्जला व्रत करून पतीच्या दीर्घायुष्यासाठी हरितालिकेला प्रार्थना करतात. भाद्रपदाच्या शुक्ल तृतीयेला हस्त नक्षत्रात भगवान शंकर आणि माता पार्वती यांच्या पूजेला विशेष महत्त्व असल्याने विवाहित स्त्रिया अन्नपाण्याशिवाय हरतालिकेचे व्रत पाळतात. सर्वप्रथम माता पार्वतीने भगवान शंकराला पती म्हणून प्राप्त करण्यासाठी हे व्रत केले होते. म्हणून गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी हरितालिका देशभरात पूजन केले जाते.