
वेंगुर्ले : 10 वीचा सिंधुदुर्गचा 99. 35 टक्के लागला होता. यात वेंगुर्ले तालुक्यातील अर्पिता अमेय सामंत ही विद्यार्थिनी 99. 40 टक्के गुणांसह दुसरी आलेली. मात्र, आता रिचेकिंगमध्ये अर्पिताला 100 पैकी 100 मिळालेत. त्यामुळे सिंधुदुर्गात ती प्रथम आलीय.
वेंगुर्ले तालुक्यातील अण्णासाहेब देसाई विद्यामंदिर परुळे या प्रशालेची ही विद्यार्थिनी. रिचेकिंगसाठी तिने अर्ज केला होता. यात अपेक्षेप्रमाणे तिचे गुण वाढलेत. त्यामुळे तिला 100 टक्के मिळालेत. सुरुवातीला तिला 99. 40 टक्के होते. त्यामुळे सिंधुदुर्गात तिचा दुसरा कक्रमांक आला होता. या वाढलेल्या गुणामुळे अर्पिता सिंधुदुर्गात प्रथम आलीय. अर्पितासह निधी सावंत सेंट उर्सुला वरवडे आणि सौजन्या घाटकर बॅ. नाथ पै कुडाळ या विद्यार्थिनीना 100 टक्के गुण आहेत. अर्पिताच्या यशासाठी सोशल मिडीयावर तिचे अभिनंदन केल्या जाणाऱ्या पोस्ट व्हायरल होतायत.