
देवगड : देवगड तालुक्यातील महाळुंगे गावच्या सुपुत्री अर्पिता सीताराम देवलकर हिने जिल्हास्तरीय वेट लिफ्टिंग स्पर्धेमद्ये प्रथम क्रमांक पटकावला असून आता तिची निवड महाराष्ट्रा पातळी वर होणार आहे.अर्पिता च्या या यशामुळे तिने देवगड तालुक्यासह आपल्या महाळुंगे गावाचे नाव रोशन केले आहे.याप्रसंगी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी महाळुंगे गावात जात अर्पिता चा सत्कार करत तिला पुढील वाचटचालीस शुभेच्छा दिल्या. महाळुंगे गावच्या ग्रामस्थांच्या सूचनेनुसार, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी थेट गावात जात नवलेवाडी येथील स्वामी समर्थ मठ येथे अर्पिता सिताराम देवलकर हिच्या पाठीवर कौतुकाची थाप देत तिचा सत्कार केला.
यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या सोबत तालुकाप्रमुख मिलींद साटम, रवींद्र जोगळ, विनायक साटम, मंगेश फाटक, प्रथमेश तावडे, विजकय घाडी, सुधाकर साटम, दिनेश नारकर, सादिक डोंगरकर, मुकुंद देवळेकर, मंगेश नवले, संदेश आईर, समीर नवले, सुशील देवळेकर, प्रथमेश तांबे, प्रमोद नवले, रमेश नवले, भरत तांबे, तातोजी तोरस्कर, रवींद्र पाळेकर, अजित देवळेकर, प्रदीप देवळेकर, राजेंद्र परब, विकास तोरस्कर, जनार्दन नवले व आदी महाळुंगे गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक म्हणाले की,अर्पिता ही महाळुंगे सारख्या छोट्या गावातून पुढे आली आहे ते कौतुकास्पद आहे. गावातील मुलांसाठी ती प्रेरणास्पद आहे. मुलांनी मोबाईल सोडून खेळाकडे वळणे गरजेचे आहे. महाळुंगे सारख्या गावातून पुढे येत वेट लिफ्टिंग सारख्या चांगल्या प्रकारच्या खेळात तिने जिल्हास्तरीय प्राविन्य मिळवून ती आता स्टेट लेव्हल वर सिंधुदुर्गाचे नेतृत्व म्हणून खेळायला जाणार आहे. तिने सिंधुदुर्ग च्या वतीने नॅशनल पर्यंत जावे अशी देवाचरणी आम्ही प्रार्थना करतो. तसेच आताच ऑल्मपिक देखील चालू आहेत, त्यामुळे अर्पिताने पुढच्या ऑल्मपिक साठी प्रयन्त करावेत अश्या शुभेच्छा युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी दिल्या.तसेच अर्पिता च्या आई वडिलांचे देखील नाईक यांनी कौतुक केले,त्यांनी तिला चांगल्या प्रकारे प्रोत्साहन दिले त्यामुळेच ती हे यश मिळवू शकली असे ते या वेळी म्हणाले .