आरोंदा ग्रामोन्नती सभागृहात पाककला स्पर्धा

Edited by: संदेश नाईक
Published on: January 27, 2023 19:54 PM
views 256  views

आरोंदा : संदेश नाईक : आंतर राष्ट्रीय तृण धान्य वर्ष २०२३ घोषीत झालेल्या निमीत्ताने २६ जानेवारी रोजी दुपारी तीन वाजता आरोंदा ग्रामोन्नती सभागृहात पाककला स्पर्धा घेण्यात आली. यावेळी आरोंदा गावचे सरपंच सुभाष नाईक यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी पं.च.सदस्य गोवींद(आबा) केरकर, सिध्येश नाईक व शिल्पा नाईक व आरोंदा सोसायटीचे सचिव रघुनाथ (बबन) नाईक उपस्थित होते .व यशवंत गव्हाणे (कृषी अधिकरी)अक्षय चव्हाण मीनल परब यांनी पिकांचे वीमा योजना किसान क्रेडीड कार्ड 

प्रधान मंत्री सूक्ष्म प्रक्रीया योजनेबद्दल व वेगवेगळ्या योजनेनबद्दल मार्गदर्शन केले व या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कृषि साह्याक प्रीया पवार यांनी केल .