
बांदा : दिव्य ज्योती स्कूलमध्ये इयत्ता ६ वी मध्ये शिकणारी कु. पूर्वी संजय आरोलकर हिने विविध ठिकाणी झालेल्या अॅबकस स्पर्धेत आपल्या यशाचा आलेख चढताच ठेवला आहे. प्रोअॅक्टीव अॅबकस नॅशनल स्पर्धेतही तिची निवड झाली. २८ जानेवारीला झालेल्या नॅशनल प्रोअॅक्टीव अॅबकस स्पर्धेत ती १३ व्या क्रमांकाने उत्तीर्ण झालीय. अनेक स्पर्धांमध्ये पूर्वीने चमकदार कामगिरी केलीय. तिच्या या यशाबद्दल सर्वत्र तिचं कौतुक होत आहे. यासाठी तिला शिक्षिका स्नेहा केसरकर यांचं मार्गदर्शन लाभलंय.