वैभववाडीतील अर्जुन रावराणे विद्यालयाचं आज स्नेहसंमेलन !

भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: December 19, 2022 11:55 AM
views 439  views

वैभववाडी : तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रातील अग्रगण्य शिक्षण संस्था असलेल्या वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेच्या अर्जुन रावराणे विद्यालय व कै. हेमंत केशव रावराणे महाविद्यालय, जयेंद्र दत्ताराम रावराणे इंग्लीश, सेमी इंग्लिश व मराठी किलबिल स्कुलचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा आज सोमवार दि. १९ डिसेंबरला होत आहे. मान्यवरांच्या उपस्थितीत विद्यालयाच्या पटांगणावर हा सोहळा संपन्न होणार आहे.

सोमवारी  सायंकाळी ७.३० वा .या कार्यक्रमाला प्रारंभ होणार आहे. प्रथम विद्यार्थ्यांचा विविध गुणदर्शन कार्यक्रम होणार आहे. रात्रौ ९.३० वा.वार्षिक पारितोषिक वितरण व गुणगौरव कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष आ. नितेश राणे आहेत. या स्नेहसंमेलनाचे उद्घाटन जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे शिक्षणाधिकारी मुश्ताक शेख, दै.कोकणसाद , कोकणसाद LIVE चे मुख्य संपादक सागर चव्हाण, वेंगुर्ले पोलीस निरीक्षक अतुल जाधव हे आहेत. प्रमुख उपस्थित मान्यवरांमध्ये संस्थेचे कार्याध्यक्ष सदानंद रावराणे, उपाध्यक्ष जग्गनाथ रावराणे, सचिव अर्जुन रावराणे, खजिनदार अरविंद रावराणे, संचालक यशवंत रावराणे, तसेच प्रमुख अतिथी म्हणून नगराध्यक्षा नेहा मानकर उपनगराध्यक्ष संजय सावंत माजी नगराध्यक्ष रोहन रावराणे तहसीलदार प्रसन्नजीत चव्हाण मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज कांबळे गटविकास अधिकारी जे प्रकाश परब गटशिक्षणाधिकारी मुकुंद शिनगारे आदी उपस्थित राहणार आहेत .तरी या कार्यक्रमासाठी शिक्षण प्रेमींनी मोठ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन  स्थानिक कमिटी अध्यक्ष जयेंद्र रावराणे व प्राचार्य बी. एस. नादकर यांनी केले आहे.