हॉटेल 'सन्मान'चे मालक अर्जुन पाटील यांचं निधन !

Edited by: विनायक गावस
Published on: November 16, 2023 15:13 PM
views 614  views

सावंतवाडी : सावंतवाडी शहरातील हॉटेल 'सन्मान'चे मालक अर्जुन दत्तू पाटील यांचं आज निधन झालं. वयाच्या ८३ व्या वर्षी त्यांनी माठेवाडा येथील निवासस्थानी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलं, नातवंड असा मोठा परिवार आहे.

प्रदीप पाटील व प्रकाश पाटील यांचे ते वडील होते. त्यांच्या निधनाने पाटील कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. येथील उपरलकर स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.