घरात वाद, डोक्यात गेला राग ; तरुणाने उचलल मोठं पाऊल

Edited by: विनायक गावस
Published on: June 22, 2023 19:29 PM
views 126  views

सावंतवाडी : कोलगाव येथील ४७ वर्षीय तरुण बेपत्ता झाला आहे. मनिष भास्कर मडव असे त्याचे नाव आहे. याबाबतची खबर त्यांची पत्नी सीमा मडव यांनी सावंतवाडी पोलिस ठाण्यात खबर दिली आहे. त्यानुसार येथील पोलीस ठाण्यात नापत्याची नोंद करण्यात आली आहे.

    याबाबत अधिक माहिती अशी की, मडव हे मंगळवार पासून बेपत्ता आहेत. ते घरात वाद झाल्यामुळे रागाने निघून गेला ते अद्याप पर्यंत आलेच नाही नातेवाईकांकडे चौकशी करुनही ती सापडले नाही. त्यामुळे त्यांची पत्नी सीमा यांनी सावंतवाडी पोलिस ठाण्यात खबर दिली आहे.