अर्चना सावंत यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका गौरव पुरस्कार प्रदान

Edited by: विनायक गांवस
Published on: December 30, 2024 18:41 PM
views 177  views

सावंतवाडी : कारिवडे येथील परमपूज्य आप्पासाहेब पटवर्धन माध्यमिक विद्यालयातील इंग्रजी विषयाच्या शिक्षिका अर्चना सावंत यांना राज्यस्तरीय सिंधुदुर्ग आदर्श शिक्षिका गौरवपुरस्कार प्रदान करण्यात आला. साहित्यिक लेखक डॉक्टर मिलिंद कुलकर्णी व सहाय्यक गटविकास अधिकारी श्री खराडे यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. 

हुतात्मा अपंग बहुउद्देशीय विकास कल्याणकारी संस्था कराड व श्री स्वामी समर्थ मंडळ राठीवडे मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय गौरव पुरस्कार वितरण कार्यक्रम देवगड येथील जामसडे हायस्कूलच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता. यावेळी व्यासपीठावर अपंग संस्थेचे अध्यक्ष सुनील फडतरे, केंद्रप्रमुख सुदाम जोशी,सेवानिवृत्त पोलीस अधिकारी सूर्यकांत तळेकर, सुरेश जोशी, श्री गोगटे. पोषण आहार विभागाचे श्री मिरजकर,गटविकास अधिकारी किरण काळे,आदी मान्यवर उपस्थित होते.

अपंग संस्थेच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तसेच रत्नागिरी रायगड कोल्हापूर आदि महाराष्ट्रभरातील व्यक्तींचा गौरव पुरस्कार देऊन करण्यात येतो. श्री फडतरे यांनी ही संस्था सुरू केली आहे त्यांनी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा विशेष गौरव करून त्यांचा सन्मान करण्याचे ध्येय ठेवले आहे. त्यानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गेली २५ वर्षे विनाअनुदानित तत्त्वावरील शाळेत विद्यार्थ्यांना घडवण्याचे कार्य अविरतपणे करणाऱ्या शिक्षिका अर्चना सावंत हिचा राज्यस्तरीय सिंधुदुर्ग जिल्हा शैक्षणिक रत्न गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. सौ सावंत या कारिवडे सारख्या दुर्गम डोंगराळ भागातील शाळेत गेली २५ वर्ष विना अनुदानित तत्त्वावरील शाळेत इंग्रजी शिक्षिका म्हणून ज्ञानदान देत आहेत त्यांनी शैक्षणिक कार्याबरोबर आदर्श विद्यार्थी घडवण्याच्या दृष्टीने त्यांचे मोलाचे कार्य आहे. त्यांनी आपल्या कठीण परिस्थितीत ज्ञानदानाचे कार्य त्या करत आहेत. त्यांनी दुर्गम शाळेत कुठलीही सुविधा नसताना मुख्याध्यापक म्हणून उल्लेखनीय कार्य केले आहे. दिव्यांग असतानाही त्यांनी शिक्षण क्षेत्रात त्या उल्लेखनीय कार्य करत आहेत त्यांनी शिक्षण क्षेत्रात कार्यरत असताना वकिली क्षेत्राची पदवी प्रदान केली आहे. त्यांच्या एकंदरीत पंचवीस वर्षाच्या शैक्षणिक क्षेत्रातील कार्याबद्दल त्यांचा हा गौरव करण्यात आला आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना डॉक्टर मिलिंद कुलकर्णी म्हणाले.

अपंग संस्थेने असे काही हिरे निवडले आहेत ज्यांचे कार्य महान आहे त्यांनी आपल्या कर्तुत्वावर यशाचा दिवा पेटवला आहे. प्रकाश मय असे काम या सर्वांच्या हातून घडत आहे ही संस्था अशा हिऱ्यांना निवडून त्यांच्या कलागुणांना वाव देण्याचे काम करत आहे हे कौतुकास्पद आहे . यश मिळवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते आणि त्याचवेळी कुणीतरी आपल्या मेहनतीचं दखल घेतो आणि खऱ्या अर्थाने या संस्थेने ज्यांचा सत्कार केला त्या सर्वांची दखल घेतली आहे हे खरोखर कौतुकास्पद आहे असे ते म्हणाले यावेळी गटविकास अधिकारी व सहाय्य गटविकास अधिकारी श्री खराडे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.