
सावंतवाडी : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब यांनी जनता संवादच्या माध्यमातून जनतेच्या समस्या प्रत्यक्ष ऐकून घेतल्या. त्या समस्या सोडवण्यासाठी सालईवाडा, सावंतवाडी येथील यशवंतराव चव्हाण सेंटरच्या कार्यालयात त्यांनी नागरिकांशी संवाद साधला. यावेळी अनेक नागरिकांनी त्यांना भेटून त्यांच्या समस्या, अडचणी मांडल्या. याबाबत तातडीने संबंधीत अधिकाऱ्यांना फोन वरून सूचना करून अनेक समस्या सोडवण्यात आल्या. तर काही समस्यांबाबत आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचनाही संबंधितांना अर्चना घारे-परब यांनी दिल्या.
यशवंतराव चव्हाण सेंटरच्या माध्यमातून महिलांना समुपदेशन, कायदेशीर मदत व मागदर्शन देखील केलं जातं. आजवर शेकडो महिलांना या केंद्राच्या माध्यमातून समुपदेशन व कायदेशीर मार्गदर्शन करण्यात आले आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला शहराध्यक्ष अँड सायली दुभाषी उपस्थित होत्या.