
सावंतवाडी : राष्ट्रवादीवादी कॉग्रेस पार्टीतील बंडानंतर शरद पवारांची मुलुख मैदानी 'तोफ' तळकोकणात धडकत आहे. शरद पवार समर्थक राष्ट्रवादीनं यानिमित्ताने सिंधुदुर्ग जिल्ह्यात जोरदार शक्तीप्रदर्शन केलं. जिल्ह्यात आगमन झाल्यानंतर विरोधीपक्षनेते जितेंद्र आव्हाड यांच बांदानगरीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब यांच्या हस्ते जंगी स्वागत करण्यात आले.
यावेळी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, जिल्हाध्यक्ष अमित सामंत, तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. थोड्याच वेळात फायरब्रॅण्ड नेते जितेंद्र आव्हाड यांची कुडाळनगरीत सभा होणार आहे.