सद्गुरु मियाँसाबांचं अर्चना घारेंनी घेतलं दर्शन !

Edited by: विनायक गांवस
Published on: July 02, 2024 11:36 AM
views 205  views

सावंतवाडी  : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आणि तमाम कोकण प्रांतातील जनतेचे दुःख हरू दे, त्यांना सुख समृद्धी आणि निरामय आयुष्य लाभू दे अशी  प्रार्थना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाच्या कोकण महिला प्रदेशाध्यक्षा अर्चना घारे - परब यांनी येथील परमपूज्य सद्गुरु मियाँसाब यांच्या ७९ व्या पुण्यतिथी उत्सव सोहळ्यानिमित्त दर्शन घेऊन केली.

सावंतवाडी येथील परमपूज्य सद्गुरु श्री मियाँसाब यांच्या ७९ वा पुण्यतिथी उत्सव सोहळा मंगळवारी 2 जुलै रोजी संपन्न झाला. यानिमित्त सावंतवाडी आणि तमाम महाराष्ट्रातील भाविक भक्तांनी सद्गुरु मियाँसाब यांचे दर्शन घेत आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी साकडे घातले. दरम्यान, अर्चना फाऊंडेशनच्या अध्यक्षा अर्चना घारे - परब यांनीदेखील मनोभावे दर्शन घेत सद्गुरू मियाँसाब यांच्या चरणी लीन होत कोकणच्या समृद्धीसाठी प्रार्थना केली व त्यांच्या दर्शनाचा लाभ घेतला. यावेळी त्यांच्यासोबत सावंतवाडी महिला शहराध्यक्ष ॲड. सायली दुभाषी तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते  उपस्थित होते.