अर्चना घारेंनी दाखवली ताकद..! | राष्ट्रवादीचा मेळावा हाऊसफुल्ल!

Edited by:
Published on: October 13, 2023 12:48 PM
views 557  views

सावंतवाडी : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणी व कार्यकर्ता मेळावा सावंतवाडीत पार पडत आहे. या मेळाव्यात माजी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील उपस्थित असून कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब यांनी आपली ताकद दाखवून दिली आहे. सावंतवाडी मतदार संघातील पक्ष शरद पवार यांच्यासोबत असल्याचं त्यांनी मेळावा हाऊसफुल्ल करत दाखवून दिलं. पक्षाध्यक्ष शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा सावंतवाडीत होत आहे.

माजी मंत्री तथा आमदार  बाळासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या  कार्यकर्ता मेळाव्यात अर्चना घारेंनी आपली ताकद दाखवून दिली. यावेळी राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष संदीप गवस यांनी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून अर्चना घारेंना उमेदवारी जाहीर करावी अशी मागणी केली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहिल्या क्रमांकाला असलेला पक्ष तळाला पोहचल्यानंतर कार्यकर्त्यांच्या गर्दीनं सभागृह खचाखच भरून दाखवत अर्चना घारेंनी आपली ताकद दाखवली.


तर नुकत्याच झालेल्या पक्षफुटीनंतर सिंधुदुर्ग जिल्हा व सावंतवाडी मतदारसंघ शरद पवार यांच्या सोबत असल्याचं अर्चना घारेंनी दाखवून दिलं आहे. तर राष्ट्रवादी संपली अस म्हणणाऱ्यांना घारेंनी मेळाव्यातून उत्तर दिल्याच मत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केले. यावेळीमाजी सहकारी मंत्री बाळासाहेब पाटील, राष्ट्रवादीच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब, जिल्हाध्यक्ष अमित सामंत, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, निरीक्षक शेखर माने, व्हिक्टर डान्टस, रेवती राणे, प्रसाद रेगे, पुंडलिक दळवी आदींसह जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.