
सावंतवाडी : ज्येष्ठ नेते, शरद पवार यांच्याविषयी सदाभाऊ खोत यांनी अतिशय खालच्या थराला जाऊन घृणास्पद वक्तव्य केले आहे. त्यांच्या या वक्तव्याचा निषेध करावा तेवढा कमी असून अतिशय संतापजनक वक्तव्य आहे. या संपूर्ण प्रकारचा मी तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करते असे मत सावंतवाडी मतदारसंघातील अपक्ष उमेदवार अर्चना घारे-परब यांनी व्यक्त केले.
शरदचंद्र पवार साहेबांवर केलेली अशा प्रकारची वक्तव्ये आम्ही कदापीही खपवून घेणार नाही. तसेच या प्रकारची वक्तव्ये सर्वांनी टाळावीत व एक तारतम्य आणि भान बाळगून प्रचार करावा असे आवाहन देखील सौ. घारे यांनी केले. सदाभाऊ खोत यांनी केलेल्या टीकेचा समाचार घेत त्यांनी खडेबोल सुनावले आहेत. महिलांच्या मातृत्वा वेदनांवर बोलताना स्वतःच्या आईच्या वेदना देखील खोत विसरल्याचे विधना सौ. घारे यांनी केले.