अर्चना घारे - परब यांनी घेतली रोहित पवार यांची भेट !

सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील प्रश्नांबाबत केली चर्चा
Edited by: विनायक गावस
Published on: November 09, 2023 13:05 PM
views 1049  views

सावंतवाडी : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा नेते आमदार रोहित पवार यांची राष्ट्रवादी कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब यांनी भेट घेत त्यांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील अनेक प्रश्नांबाबत यावेळी त्यांनी चर्चा केली.

मतदारसंघातील पक्ष संघटनेची बांधणी, कामकाज, आगामी कार्यक्रम याबाबत त्यांना माहिती दिली. येत्या जानेवारी महिन्यात सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील युवकांना, कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी रोहित पवार सावंतवाडी दौऱ्यावर येणार आहेत. याबाबतही यावेळी चर्चा झाली. दीपावली महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी एका युवा उर्जावान नेत्याची भेट झाल्याने उत्सवाचा आनंद द्विगुणित झाल्याची भावना अर्चना घारेंनी यावेळी व्यक्त केली. यावेळी संदीप घारे उपस्थित होते.