अर्चना घारे-परब यांनी घेतलं घरगुती गणेशाचे दर्शन

Edited by: विनायक गांवस
Published on: September 11, 2024 05:53 AM
views 391  views

सावंतवाडी : कोकणात अमाप उत्साहात साजरा करण्यात येणारा सण म्हणजे गणेश चतुर्थी. ‘गणेश चतुर्थी’ या दोन शब्दांनीच कोकणी माणसाच्या चेहऱ्यावर आनंद, उत्साह, चैतन्य भरभरून वाहायला लागते. घरोघरी गणरायाचे आगमन होते‌. जनतेच्या या आनंदात सहभागी होत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब यांनी घरगुती गणेशाचे दर्शन घेतले. 


सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील सावंतवाडी, दोडामार्ग व वेंगुर्ला तालुक्यात घरोघरी जात अर्चना घारे यांनी गणेश दर्शन घेतले. कोकणी माणसाच्या चेहऱ्यावर आनंद, उत्साह, चैतन्य आणणाऱ्या उत्सवात त्यांनी सहभाग घेतला. तालुक्यातील चौकुळ गावामधील ७० कुटुंबियांच्या गणेशाचे दर्शन त्यांनी घेतले. यावेळी विभक्त कुटुंब पद्धतीमुळे आजकाल एकत्रित कुटुंबे दिसत नाहीत. कोकणात मात्र ही कुटुंबे आजही आहेत. गणेशोत्सवाच्या परंपरागत चालिरिती ही कुटुंबे वर्षांनुवर्षे जपत आहेत. एकत्र कुटुंबांचा गणपती हा आजच्या समाजव्यवस्थेत आदर्श असाच आहे असे मत अर्चना घारे यांनी व्यक्त केले. यावेळी संतोष गावडे, लक्ष्मण गावडे, महेश गावडे, बाबुराव गावडे, कल्पना गावडे, अल्का गावडे आदी उपस्थित होते.