
सावंतवाडी : कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब यांनी कुटुंबियांसोबत निवासस्थानी विराजमान गणरायाची पूजा केली. यावेळी कुटुंबियांकडून सर्व गणेशभक्तांना सदृढ आरोग्य, व सुख समाधान प्राप्त होण्यासाठी गणरायाकडे साकडे घातले.
सौ. घारे यांनी सर्वांना निरोगी आरोग्य, सुख, समाधान लाभुदेत. तळकोकणातील विविध समस्या सोडवण्याचा संकल्प करून त्या सोडविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करत आहे. यासाठी आपली साथ आणि गणरायाचा आशीर्वाद असाच पाठीशी राहु देत असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब यांनी केले. तमाम कोकणवासियांना त्यांनी गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.