
सावंतवाडी : राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या कोकण विभाग अध्यक्ष सौ. अर्चना घारे यांचा वाढदिवस १ डिसेंबर २०२३ रोजी विविध सामाजिक उपक्रमांसह साजरा करण्यात येणार आहे. अर्चना फाऊंडेशनच्यावतीने व पुस्तक विश्वच्या सहकार्याने भव्य पुस्तक आणि वैज्ञानिक खेळण्यांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
प्रदर्शनाचे उद्घाटन १ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १० वा. ज्येष्ठ पत्रकार शेखर सामंत यांच्या हस्ते आणि माजी राज्यमंत्री प्रविण भोसले, ज्येष्ठ पत्रकार शिवप्रसाद देसाई, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत, साहित्यिक प्रा. डॉ. गोविंद काजरेकर, कवयित्री डॉ. शरयू आसोलकर, अटल प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. नकुल पार्सेकर, प्रसिद्ध मालवणी कवी दादा मडकईकर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. श्री देव नारायण मंदिर हॉल, मोती तलाव समोर, मेन रोड, सावंतवाडी येथे शुक्रवार १ डिसेंबर २०२३ ते मंगळवार १२ डिसेंबर २०२३ पर्यंत सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत या प्रदर्शनचा लाभ घेता येणार आहे. सर्वांनी आपल्या मित्र परिवार, कुटुंबासह या प्रदर्शनास भेट देऊन पुस्तकांच्या दुनियेची सफर करावी आणि ज्ञानाची शिदोरी सोबत न्यावी असे आवाहन अर्चना फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.