
सावंतवाडी : ना पक्ष ना चिन्ह ना नेते फक्त प्रामाणिक कार्यकर्ता घेवून ही स्वाभिमानाची लढ़ाई लढले. पराभवाचे आत्मचिंतन करुन काम सुरूच ठेवणार. मला मतदान केलेल्या सर्व मतदार बंधु भगिनींचे आभार असे मत अपक्ष उमेदवार अर्चना घारेनी व्यक्त केले. तसेच आजचा निकाल धक्कादायक असून मतदारांचा कौल मला मान्य आहे. महायुतीला मिळालेले यश म्हणजे धनशक्तीचा विजय आहे असंही सांगितलं. त्या म्हणाल्या, आजचा निकाल धक्कादायक असून मतदारांचा कौल मला मान्य आहे. महायुतीला मिळालेले यश म्हणजे धनशक्तीचा विजय आहे.
राजकारणाचा स्थर खुपच खालावलेला आहे असं मत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा तथा अपक्ष उमेदवार अर्चना घारे-परब यांनी व्यक्त केले. घारे म्हणाल्या, अनेक अफवा पसरवून राजकारण केले गेले.महिलांना धमकावण्याचे प्रकार झाले. सावंतवाडीच्या संस्कृतीला साजेशी निवडणूक झाली नाही. ना पक्ष ना चिन्ह ना नेते फक्त प्रामाणिक कार्यकर्ता घेवून ही स्वाभिमानाची लढ़ाई लढले. पराभवाचे आत्मचिंतन करुन काम सुरूच ठेवणार.
मला मतदान केलेल्या सर्व मतदार बंधु भगिनींचे आभार असे मत घारेनी व्यक्त केले










