
सावंतवाडी : नको दादा, नको भाई, आता फक्त अर्चनाताई ! अशा घोषणा देत अपक्ष उमेदवार अर्चना घारे-परब यांनी शहरात झंझावाती प्रचार रॅली काढली. शहरातील नागरिक, व्यापारी यांची भेट घेत त्यांनी महिला उमेदवाराला एक संधी द्या असे आवाहन केले.
शहरात घारे समर्थकांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तारीख २०, पाकीट फिक्स असं म्हणत घारेंच्या विजयाचा दावा करण्यात आला. अर्चना घारे-परब यांनी डोअर टू डोअर जात महिला उमेदवाराला संधी द्यावी असे आवाहन केले. यावेळी अपक्ष उमेदवार अर्चना घारे-परब, अँड. नकुल पार्सेकर, पुंडलिक दळवी, देवेंद्र टेमकर, हिदायत खान यांच्यासह राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी तथा घारे समर्थक उपस्थित होते.