
दोडामार्ग : गेली पंधरा वर्षे सत्ते असणाऱ्या भाजप शिवसेना पक्षाच्या तिन्ही उमेदवारांनी सावंतवाडी मतदार संघात विकास, रोजगार, आरोग्य या सारख्या मूलभूत सोयी आणू शकले नाही हे इथल्या जनतेला माही आहे. इथली जनता सुज्ञ आहे त्यामुळे येणाऱ्या 20 तारीखला या तिन्ही उमेदवारांना जनता मतपेठीतून उत्तर देणार आहे. त्यामुळे जनशक्ती ही धनशक्ती समोर झुकणार नाही. असे अपक्ष उमेदवार अर्चना घारे परब यांनी म्हटले आहे.
दोडामार्ग अपक्ष उमेदवार अर्चना घारे परब यांच्या संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या त्यांच्या सोबत यावेळी अर्चना घारे परब यांच्या समवेत नकुल पार्सेकर , सुभाष दळवी ,संदीप गवस, प्रदीप चांदेलकर, ममता नाईक, प्रिया देसाई , सुदेश तुळसकर , उल्हास नाईक , सुभाष लोंढे , गौतम महाले , महादेव देसाई ,आनंद तुळसकर , सागर नाईक , साई शिरोडकर , रविकिरण गवस , वैभव नाईक , विनायक देसाई , ज्ञानेश्वर गवस , रिद्धी मुंगी , माधुरी वेटे , प्रतीक्षा मुंगी ,सिद्धी तुळसकर , दीपिका चांदेलकर, सुनिता भाईप , विवेक गवस आदी सर्व ग्रामस्थ , महिला , कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी त्या म्हणाल्या की सावंतवाडी मतदार संघात आम्ही प्रचार करत असताना सर्व महिला वर्ग आमच्या पाठीशी आहे. प्रत्येकाच्या तोंडून ऐकायला मिळत की गेली 15 वर्षे सत्तेत असनऱ्यांनी आमच्यासाठी काय केल नाही साधे रोजगार आणू शकले नाही विकास नाही, रस्ते नाही अशा प्रतिक्रिया देणारी जनता आता बदल घडवण्यासाठी आमच्या बाजूने आहे. तर दोडमार्ग मध्ये शेतकऱ्यांना उद्भवणारा जंगली प्रश्न यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. तसेच झाड तोडल्यास त्याला 50 हजार दंड आकारण्यात ला आहे तो दंड मी निवडून आल्यावर शिथिल करण्यासाठी प्रयत्न करेन. तसेच रस्ते बांधकाम करताना 5 वर्षे त्याला काही होणार नाही असे रस्ते करून भ्रष्टाचार मुक्त कारभार आपण करणार आहे. त्यामुळे विद्यमान आमदार यांचा पराभव निश्चितच होणार आहे. असे घारे परब यांनी बोलताना स्पष्ट केले.
तर ते पराभवाकडे झुकले
महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर यांनी अर्चना घारे परब यां राजकारणात नव्या आहेत म्हणून त्या काहीही बोलतात असं म्हटलं त्याला प्रतिउत्तर म्हणून अर्चना घरे परब म्हणाल्या की त्यांना आता माझी भीती वाटू लागली आहे. ते आता पाराभवाकडे झुकत आहेत. आमच्या बाजूने जनशक्तीचा वाढता कौल बघून अस बोलत आहे अस अर्चना घरे परब म्हणाल्या.
अर्चना ताई संवेदनशील उमेदवार : नकुल पार्सेकर
जनमानसाच्या भावना जपणाऱ्या संवेदनशील उमेदवार तुम्हाला अर्चना घारे परब यांच्या रूपात मिळाला आहे. गेली पंधरा वर्षे आपण फक्त गाजराची शेती बघितली आणि त्या शेतीतले गाजरही पिकले नाहीत हे त्याचा वास्तव आहे. मतदानाच्या अगोदर चार दिवस आपण मतदारसंघात फिरणार अशी पत्रकार परिषद घेऊन सांगणारे महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर गेले वीस दिवस आपल्या मतदारसंघात ठाण मांडून आहेत ही त्यांच्या पराभवाची नांदी आहे. आपल्याला धनशक्ती विरोधातील एक चांगला उमेदवार अर्चना घारे परब यांच्यातून आला आहे. सावंतवाडी मतदारसंघात फिरताना पायाला भिंगरी लावून त्या सध्या फिरत आहेत. पुढच्या दोन दिवसात तुम्ही स्वतः उमेदवार आहात असं समजून कामाला लागा अर्चनाताई घारे परब यांना प्रचंड मतांनी निवडून द्या असे आवाहन नकुल पार्सेकर यांनी केले
जुन्यांनी तरी काय केले ?
अर्चना घारे परब या राजकारणात नवीन आहेत असं म्हणणाऱ्या दीपक केसरकर यांनी पंधरा वर्षात काय केलं हे त्यांनी दाखवून द्यावं. किती विकास, रोजगार आणले हे त्यांनी सांगाव. महाविकास आघाडी कडून अर्चनाताई यांच्यावर अन्याय झाला आहे त्यामुळे महिला म्हणून आम्ही अर्चनाताईंना पाठिंबा देणार आहोत प्रत्येक गावागावातून चांगला असा प्रतिसाद आम्हाला मिळत आहे त्यामुळे आमच्या अर्चना ताईच निवडून येणार अशी आमची खात्री आहे.
विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली : उल्हास नाईक
दिवस रात्र आम्ही मतदार संघात फिरत आहोत हे पाहून विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. एक स्त्री रात्रंदिवस फिरत आहे जनतेच्या सेवेचा तिने वसाहाती घेतला आहे. हे सर्व करत असताना दशावतारी कलाकारांना तीन महिन्याच्या कालावधीत निर्माण करणार असल्याचा शब्द त्यांनी दिला आहे. त्यामुळे आम्ही दशावतारी कलाकार अर्चना घारे परब यांना शब्द देतो की पूर्णपणे पाठिंबा देऊन अर्चना घारे परबच निवडून येतील असा आमचा विश्वास आहे.