
सावंतवाडी : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या बंडखोर अपक्ष उमेदवार अर्चना घारे-परब यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याचे विधान माजी खासदार विनायक राऊत यांनी केले. काँग्रेसच्या सभेत बोलताना त्यांनी यावर भाष्य केले. महाविकास आघाडीत ज्यांनी बंडखोरी केली त्यांच्यावर हकालपट्टीची कारवाई झाल्याचे त्यांनी सांगितले.
रविवारी सावंतवाडी श्रीराम वाचन मंदिर इथे राष्ट्रीय काँग्रेसची सभा महाविकास आघाडीचे उमेदवार राजन तेली यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. यावेळी कॉग्रेस नेते अँड. दिलीप नार्वेकर, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, राघवेंद्र नार्वेकर महेंद्र सांगेलकर विभावरी सुकी राजू मसुरकर हे प्रमुख नेते या कार्यक्रमास उपस्थित होते. यावेळी बोलताना माजी खासदार विनायक राऊत यांनी घारेंच्या बाबतीतले विधान केले.
दरम्यान, अर्चान घारे यांना याबाबत विचारले असता अद्याप कोणतही पक्षाचे पत्र याबाबत प्राप्त झालेलं नाही. पक्षातून हकालपट्टीचा निर्णय राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते घेतील. विनायक राऊत हे महाविकास आघाडीतील घटक पक्ष उबाठा शिवसेनेचे नेते असल्याचे सांगत याबाबत इन्कार केला.