
सावंतवाडी : अपक्ष उमेदवार अर्चना घारे परब यांच्या प्रचाराला भालावल येथून सुरुवात झाली. आज सकाळपासून अपक्ष उमेदवार सौ.घारे परब यांनी त्यांच्या प्रचाराची सुरुवात आपल्या भालावल येथील श्री देवी सातेरी देवीला श्रीफळ ठेवून व सर्व देवदेवतांचे आशिर्वाद घेऊन केली.
आजपासून त्यांच्या प्रचाराची सुरुवात करण्यात आली. यावेळी भालावल , कोनशी , सरमळे , नांगरतास , दाभिल , असणीये येथील सर्व मानकरी ग्रामस्थ मंडळी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच या नंतर कोनशी , तांबोळी , असनीये , घारपी , फुकेरी , वाफोली , विलवडे , सरमळे , ओटवणे आदी गावामध्ये प्रचारास गावातील सर्व ग्रामस्थ, महिला मोठ्या संख्येने उपस्थित राहून 'लिफाफा' इतिहास घडवेल अशा शब्दांत विजयाचा विश्वास व्यक्त करत अर्चना घारे परब यांना शुभेछा दिल्या.