विनायक राऊतांना मतदारसंघातून लीड देऊ : अर्चना घारे-परब

Edited by: विनायक गांवस
Published on: April 29, 2024 13:25 PM
views 462  views

सावंतवाडी : इंडिया आघाडीचे उमेदवार खासदार विनायक राऊत यांना ग्रामीण भागात मिळवणारा प्रतिसाद पाहता मतदारसंघातून मोठं मताधिक्य त्यांना मिळेल असा विश्वास राष्ट्रवादीच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब यांनी व्यक्त केला. खासदार राऊत यांच्या प्रचारार्थ आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या.

त्या म्हणाल्या, रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील इंडिया आघाडीचे अधिकृत उमेदवार खासदार विनायक राऊत यांच्या प्रचारा निमित्त बांदा, वाफोली गावांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब यांनी भेटी दिल्या. यावेळी त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. विनायक राऊत यांना ग्रामस्थांचा पाठिंबा असून मोठ्या प्रमाणात मताधिक्य मतदारसंघातून मिळेल असा विश्वास अर्चना घारे-परब यांनी व्यक्त केला. याप्रसंगी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, कॉंग्रेस नेते विकास सावंत, माजी नगराध्यक्ष अँड. दिलीप नार्वेकर, विभावरी सुकी, रूपेश राऊळ, महेंद्र सांगेलकर आदी महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.