अर्चना घारेंनी केलं मतदान !

Edited by: विनायक गांवस
Published on: June 26, 2024 15:18 PM
views 190  views

सावंतवाडी : सावंतवाडी जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा क्रमांक पाच येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा सौ.अर्चना घारे यांनी मतदानाचा हक्क बजावला.  महाविकास आघाडीच्या तहसील कार्यालय व शाळा क्रमांक पाच येथील महाविकास आघाडीच्या बुथना त्यांनी भेटी दिल्या. महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमधील उत्साह पाहता रमेश कीर यांना पदवीधर मतदार निवडून देतील असा विश्वास अर्चना घारेंनी व्यक्त केला.


कोकण पदवीधर मतदार संघात विद्यमान आमदार पदवीधरांसाठी काही करू शकले नाहीत. त्यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश कीर विजयी होतील असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे परब यांनी व्यक्त केला. यावेळी राष्ट्रवादीच्या महिला शहर अध्यक्ष अँड. सायली दुभाषी, अॅड राबिया शेख आगा आदी उपस्थित होते.