
सावंतवाडी : मी जनतेची उमेदवार असून जनता माझ्या पाठीशी आहे. माझी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील सामाजिक बांधिलकी आणि एकूणच माझी कार्य करण्याची पद्धत ही सामान्य जनतेला आवडली आहे. त्यामुळे विजयाची संपूर्ण खात्री आहे, असा विश्वास अपक्ष उमेदवार अर्चना घारे - परब यांनी व्यक्त केला.
सावंतवाडी तालुक्यातील भालावल येथे पती संदीप घारे यांसह सौ. अर्चना घारे-परब यांनी मतदानाचा पवित्र हक्क बजावला. यावेळी त्यांनी सर्वप्रथम श्री देवी सातेरीचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतला. दरम्यान, मला विजयाची पूर्णता खात्री असल्यामुळे मी कार्य करण्यासाठी नेहमीच तत्पर आहे असे देखील त्यांनी नमूद केले.