अर्चना घारेंनी तहसिलदारांची घेतली भेट | नुकसान भरपाई दिरंगाई बद्दल केली चर्चा

Edited by: विनायक गावस
Published on: March 31, 2024 07:35 AM
views 296  views

सावंतवाडी : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब यांनी सावंतवाडी तालुक्याचे तहसिलदार श्रीधर पाटील यांची भेट घेतली.२०१९ - २०२१ सालातील नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकरी आणि व्यापारी यांना नुकसान भरपाई मिळण्यास होणाऱ्या दिरंगाई बद्दल त्यांनी सविस्तर चर्चा केली. सरकारने शेतकरी आणि व्यापारी यांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे केले असून देखील नुकसान भरपाईसाठी आलेली ७५ % रक्कम दिली जात नाही. यामागचे कारण काय आहे ? तसेच यासाठी काही शासकीय कागदपत्रांची पूर्तता करायची आहे का ? या बाबत चर्चा केली. या चर्चेमधून काही शेतकऱ्यांची KYC, SOP करण्याचे काम अपूर्ण असल्याने ते पूर्ण झाल्यावर १५ मेपर्यंत सर्व शेतकरी आणि व्यापारी यांना नुकसान भरपाई त्यांच्या खात्यात वर्ग करण्यात येईल असे तहसीलदार पाटील यांनी यावेळी सांगितले. तसेच KYC करण्यासाठी काही संस्थानी प्रशासनाला मदत करावी असे आवाहन तहसीलदार यांनी केले. तर त्यासाठी अर्चना फाउंडेशनच्या माध्यमातून नक्की मदत करू असे आश्वासन यावेळी घारे यांनी दिले. नुकसानग्रस्त शेतकरी आणि व्यापारी बांधवानी यासाठी आमच्याशी संपर्क साधावा असे आवाहन त्यांनी केल. याप्रसंगी अँड. सायली दुभाषी, हिदायतुल्ला खान, राकेश नेवगी आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.